एक होता राजा . त्याचे राज्य सर्वदूर पसरले होते. राज्यात सर्वत्र भरभराट होती. कुणाला कशाचीही कमतरता नव्हती.
राजा प्रजेची पितृप्रेमाने काळजी घ्यायचा. प्रजाजन भरभरून आशीर्वाद देत.
राजाची पत्नीही सुस्वरूप व सुस्वभावी होती. जणूकाही प्रजेची आईच. राजाराणीला एकुलते एक पुत्ररत्नही होते.
एवढे सर्व चांगले असूनही राजाराणी मात्र दुःखी होते. काय बरे कारण होते त्यांच्या दुःखाचे?
त्यांचा एकुलता एक राजपुत्र आंधळा होता. ठार आंधळा.
अनेक वैद्य उपचार करण्यासाठी येऊन गेले पण सर्वांनी हात टेकले. राजपुत्राच्या काळजीने राजाराणी पार हताश झाले होते.
त्यांची ती अवस्था कोणालाही पाहवत नसे.सर्व मंत्री सतत चांगल्या वैद्याच्या शोधात असत.
एके दिवशी त्या राज्यात एक विद्वान महात्मा अवतरले. प्रधानजींना ही बातमी समजली. प्रधानजी तात्काळ त्या महात्म्यास भेटावयास निघाले...
नमस्कार,
मित्रांनो कथेची एवढीशी सुरूवात वाचताच आपल्या मनात कितीतरी विचारचक्रे फिरू लागतात.
राजाराणीविषयी सहानुभुती निर्माण होते. प्रजेची निष्ठा समजते आणि संपूर्ण गोष्ट वाचण्याची आस लागते.
म्हणूनच कथाप्रकार जगात सर्वत्र प्रसिद्ध पावला आहे .
यया कथांचा कोठे केव्हा झाला असेल बरं?
घेऊया आपण शोध.
खरेतर जेव्हा दोन व्यक्ती समोरासमोर तेव्हापासूनच कथाकथनास सुरूवात झाली असे म्हणता येईल .
ते कसे ते पुढील पोस्ट मध्ये वाचू.
धन्यवाद.